गुढीपाडवा / Gudhipadwa

गुढीपाडवा मागचे शास्त्र आणि विज्ञान

संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये
“अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं
। सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥”
“ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं ।
गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥”;
“माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी ।
येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥” असे उल्लेख येतात.
संत नामदेव (इ.स. १२७० – जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई (निर्वाण इ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष – इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनांत, गुढीचे उल्लेख येतात.
संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात-
“टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥
१६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं, वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात. आणि संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें [ गुढी=कौल] म्हणजे विनंती मान्य करणें, संमती देणें, मान्यता देणें आणि गुढी डावी देणें म्हणजे विनंती अमान्य करणें, नापसंत करणें, नाही म्‍हणणें असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्त्वाचे, कदाचित निर्णायक संदेश साधन असावे.
या उपलब्ध संदर्भांचा अभ्यास केल्यानंतर, या गुढीचे अजून एक वैशिष्ट्य दिसून येते. वारी असो अथवा रणांगण असो जाणाऱ्या समूहांतील एखादा चपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे.
छत्रपती संभाजी राजेंचा औरंगजेबाने त्यांचा अनन्वित छळ केला, परंतु जवळजवळ दीड महिना जिवंत ठेवले. याचेदेखील कारण म्हणजे गुढी पाडवा. या दिवशी स्वराज्यातील सर्व जनता नवीन वर्ष साजरे करत असे. त्यांना खिजवण्यासाठी मुद्दाम औरंगजेबाने गुढी पाडव्याच्या ठीक आदल्या दिवशी महाराजांची हत्या केली आणि गुढी पाडव्याच्या दिवशी त्यांचे शीर भाल्याच्या टोकाला लटकावून अत्यंत क्रूर असे प्रदर्शन केले. स्वराज्यातील मनोबल खचवण्याचा आणि हिंदू धार्मिक सणाला हिणवण्याचा तो मुद्दाम केलेला नीच प्रकार होता
गुढीपाडवा गुढी पूजनाचा विधी
१) ब्रह्मध्वजारोहण म्हणजेच गुढी उभारणे.
सकाळी लवकर उठून सुगंधी तेल व उटणे लावून अभ्यंगस्नान करावे.
अभ्यंगस्नानानंतर स्वच्छ वस्त्र परीधान करून अंगणात श्री लक्ष्मी पद्म , श्री गायत्री पद्म व नवग्रहांची रांगोळी काढून प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे व गुढी उभारावी.

★ पूजन विधी ★
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
ध्यायम् ध्यायामी !
नमस्काराणि समर्पयामि !!
★गुढीवरील तांब्याच्या कलशावर कुंकवाने काढलेल्या स्वस्तिकाच्या मधोमध गंध , अक्षता , हळदी , कुंकु वहावे.
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
विलेपनार्थे चंदनं समर्पयामि !
अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि !
हरिद्रां कुंकूंमं सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि !!
★ गुढीस फूलांचा हार घालावा.
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
ऋतू कालोद्भव पूष्पमालाणि समर्पयामि !!
★ गुढीस धूप ओवाळावा.
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
धूपं आघ्रापयामि !!
★ गुढीस दिवा ओवाळावा.
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
दिपं दर्शयामि !!
★ गुढीस मिरे , हिंग , मीठ , ओवा , साखर , कडुनिंबाच्या फूलांसह कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून
या मिश्रणाचा नैवेद्य दाखवावा.
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
नैवेद्यं समर्पयामि !!
गुढीसमोर जमिनीवर उजव्या हाताच्या
मधल्या दोन बोटांनी पाण्याचा चौकोन करून त्यावर नैवेद्याची वाटी ठेवावी व तिच्या भोवती उजव्या हाताने तीन वेळा पाणी फिरवावे.
सत्यंत वर्तेन् परि सिंचयामि !
असे म्हणून गायत्री मंत्र म्हणावा व त्यानंतर
ॐ प्राणाय स्वाहा !
ॐ अपानाय स्वाहा !
ॐ व्यानाय स्वाहा !
ॐ उदानाय स्वाहा !
ॐ समानाय स्वाहा !
ॐ ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा !
असे म्हणावे.
यानंतर,
मध्यपाणियं समर्पयामि !
असे म्हणून पळीभर पाणी ताम्हणात सोडावे.
परत नैवेद्याभोवती पाणी फिरवावे व वरीलप्रमाणे गायत्री मंत्र , ॐ प्राणाय स्वाहा......इ. मंत्र म्हणावे.
खालील मंत्र म्हणत तीन पळ्या पाणी ताम्हणात सोडावे.
उत्तरापोशनं समर्पयामि !
हस्त प्रक्षालनं समर्पयामि !
मुख प्रक्षालनं समर्पयामि !
खालील मंत्र म्हणत गुढीस गंध अक्षता हळदी कुंकु वहावे.
करोव्दर्तनार्थे चंदनं हरीद्रा कुंकूमं सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि !
मग हात जोडून पूजेत झालेल्या चूकांबद्दल गुढी देवतेस क्षमा मागावी...,शेवटी हातात पाणी घेऊन खालील मंत्र म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे.
*अनेन मया यथाज्ञानेन यथामिलित उपचारद्रव्यै कृत पंचोपचार पूजनेन श्री ब्रह्मध्वज देवता प्रीयतां न मम् !!*
टीप :- दूपारी ४ चे आत गोड धोड नैवेद्य दाखवून गुढी उतरवावी.
उगवत्या सूर्याला अर्घ देत नवीन वर्षाचे हसतमुखाने व पवित्र अंतःकरणाने स्वागत करावे..
गुढी ही शक्यतो कोणत्याही झाडाची काठी असावी, हल्ली सर्वत्र बांबू चा वापर करतात इलाजच नसेल तर बांबूस गोमूत्रात हळद टाकून पुसून घ्यावी किंवा लेप द्यावा काठी विजयाचे प्रतीक मानले जाते,गुढीला "ती" गुढी म्हणतात तर काही ठिकाणी तिला " विजयालक्ष्मी " म्हणतात मग जसे देवीचा मूर्तीला साडी परिधान करतात तसे गुढीला देवी समजून साडी परिधान करण्याचा रिवाज किंवा प्रथा पडली आहे पण त्या ऐवजी भगवे कापड शास्त्र मान्य आहे
पालथा तांब्या - वरुण कलश किंवा पृथ्वीचे प्रतिक मानला जातो तो उलट या करिता की तीव्र उन्हा नंतर येणारा पावसाळा वरुणाचा कृपेचा ठरावा
साडी किंवा वस्त्र - खर तर साडी ची प्रथा नंतर पडली असावी मात्र वस्त्राला शास्त्राधार आहे , भगव्या रंगाचे वस्त्र उत्तम , वस्त्र निवारा किंवा विजयाचे प्रतीक
कडूनिब पाला - चैत्र पालवी येऊन कडुनिंबाला फुले येतात , हा औषधी असून याची पाने फुले धने आणि गुळ प्रसाद म्हणून देण्यामागे शरीरात आरोग्याचा वास असावा तसेच कडुनिंब मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सोडतो वातावरण शुद्ध करतो त्यानिमित्ताने झाडे लोकांनी लावावित असाही अर्थ आहे
साखरेची गुढी - विजय आणि गोडव्याच प्रतीक मानली जाते या व अशा खुप कारणांनी गुढीला विशेष महत्व आहे 
Source 
आनंद पिंपळकर © आनंदी वास्तू

Comments